सोयाबीन बाजार भाव गडगडले; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

सोयाबीन बाजार भाव देशातील प्रमुख पिकांपैकी सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु मागील काही वर्षांपासून सोयाबीनच्या बाजारभावात मोठी घट पाहायला मिळत आहे. देशातील अनेक बाजारपेठांमध्ये सध्या सोयाबीनचे दर निश्चंकी पातळीवर असून, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सध्या सोयाबीनचे दर 3800 ते 4200 रुपये प्रतिक्विंटल दरम्यान आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे.

सोयाबीन बाजार भाव दहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर

सोयाबीन बाजारातील तज्ञांच्या मते, सध्याचे दर मागील दहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर आहेत. केंद्र सरकारने 2024-25 सालाकरिता सोयाबीन पिकासाठी 4800 रुपये हमीभाव निश्चित केला आहे. मात्र, सध्या शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा 500 ते 600 रुपयांनी कमी दरात सोयाबीन विक्री करावी लागत आहे, ज्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

बाजारातील दरातील बदल आणि शेतकऱ्यांचे आंदोलन

एगमार्केटच्या आकडेवारीनुसार, 27 ऑगस्ट रोजी इंदूर बाजार समितीत सोयाबीन बाजार भाव 4500 रुपये होता, जो 30 ऑगस्ट रोजी 3310 रुपये इतका खाली आला. त्याचवेळी, महाराष्ट्रातील लातूर बाजार समितीत 29 ऑगस्ट रोजी 4420 रुपये इतका दर होता, तर राज्यातील इतर बाजार समित्यांमध्ये 4000 ते 4300 रुपये दरम्यान सोयाबीन दर पाहायला मिळाले.

मागील दशकात सोयाबीन दरांमध्ये मोठे बदल नाही

सोयाबीन प्रोसेसर ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, वर्ष 2013-14 मध्ये सोयाबीनचा दर 3823 रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास होता. म्हणजेच, सध्या सोयाबीन बाजार भाव जवळपास त्याच पातळीवर आहे. विशेष म्हणजे, सध्याच्या काळात नवीन सोयाबीनची आवक झालेली नाही तरीही भाव निश्चित पातळीवर आहे. नवीन सोयाबीन बाजारात आल्यानंतर दरांमध्ये आणखी घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांची मागणी आणि सरकारचा हस्तक्षेप

देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या सोयाबीन दरवाढीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. सरकारकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली जात आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, सरकारने हमीभावावर खरीप सोयाबीन खरेदी करावी, जेणेकरून त्यांना आर्थिक स्थैर्य मिळू शकेल.

शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांनी त्यांच्या प्रतिक्रिया आणि मते खाली कमेंटद्वारे कळवावीत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top