फवारणी पंप राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक विशेष कार्यक्रम राबवण्यात येत आहे. “राज्य पुरस्कृत सोयाबीन व कापूस मूल्य साखळी आणि उत्पादकता विकास कार्यक्रम” अंतर्गत, शेतकऱ्यांना पायाभूत सुविधांची निर्मिती, मूल्यसाखळीचा विकास आणि उत्पादकता वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत.
दोन लाखांहून अधिक फवारणी पंप वाटपाचे उद्दिष्ट
या योजनेच्या अंतर्गत, 2024 साठी शेतकऱ्यांना बैटरी ऑपरेटर फवारणी पंप आणि कापूस साठवणूक बॅग देण्याची योजना आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज मागवण्यात आले होते. शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर या फवारणी यंत्रांचे वाटप करण्यात येणार होते. सुरुवातीला एक टप्प्यामध्ये अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती, ज्यात चौदा ऑगस्ट, एकवीस ऑगस्ट, आणि एकतीस ऑगस्टपर्यंत वेळ वाढवण्यात आली.
फवारणी पंप लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड
या योजनेसाठी लाखो शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत, मात्र पंपांच्या उपलब्धतेच्या तुलनेत अर्जांची संख्या कित्येक पटीने जास्त आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना पंप मिळणार नसून लॉटरी पद्धतीने पात्र शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. लॉटरीत निवड झालेल्या शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर मोफत फवारणी यंत्र दिले जाईल.
शेतकऱ्यांना वेळेत साधन उपलब्ध होत नसल्याची नाराजी
शेतकऱ्यांना जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात या फवारणी पंप वितरण होणे अपेक्षित होते, जेव्हा त्यांची खरी गरज होती. मात्र, योजनेच्या अंमलबजावणीतील विलंबामुळे शेतकऱ्यांना हे साधन हंगामाच्या वेळेत उपलब्ध होऊ शकणार नाही. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात महा DBT अंतर्गत इतर योजनांच्या लॉटरीसह या फवारणी यंत्रांची लॉटरी लागू शकते.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती
या योजनेसंदर्भात शेतकऱ्यांना विचारल्या जाणाऱ्या विविध प्रश्नांच्या संदर्भात ही माहिती अतिशय महत्त्वाची ठरू शकते. नवीन अपडेट आणि माहिती मिळवण्यासाठी आपल्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधा.