PM किसान योजनेच्या 18 व्या हप्त्यासंदर्भात केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण अपडेट जारी केले आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 18 वा हप्ता मिळवण्यासाठी पाच आवश्यक बाबी पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. या पाच बाबी जर पूर्ण असतील तरच तुमच्या खात्यात हप्ता जमा होईल; अन्यथा, हप्ता मिळणार नाही.
पाच आवश्यक बाबींची पूर्तता अनिवार्य
18 वा हप्ता खात्यावर जमा होण्यासाठी सरकारने दिलेल्या पाच कामांची पूर्तता अनिवार्य आहे. या बाबींमध्ये कोणकोणते घटक आहेत, हे तपासणे आणि त्या योग्यरित्या पूर्ण करणे आवश्यक आहे. सध्या अनेक लाभार्थ्यांना PM किसान योजनेचा 17 हप्ता 18 जून 2024 रोजी मिळालेला नाही, तर काहींना मिळालेला आहे. या दोन्ही प्रकारच्या लाभार्थ्यांसाठी हा अपडेट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
नवीन नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांसाठी विशेष सूचना
ज्यांनी PM किसान योजनेमध्ये नवीन नोंदणी केलेली आहे, अशा लाभार्थ्यांसाठी ही माहिती अधिक महत्त्वपूर्ण आहे. योग्य प्रक्रिया आणि आवश्यक बाबींची पूर्तता करूनच हप्ता मिळवता येईल.
कशा पद्धतीने करायची तपासणी?
सरकारने दिलेल्या पाच बाबी कशा तपासायच्या आणि त्या पूर्ण झालेल्या आहेत की नाही, हे कसे जाणून घ्यायचे याबाबतची संपूर्ण माहिती लेखाच्या माध्यमातून समजून घ्या. तुमच्या बाबी पूर्ण झालेल्या नसतील तर काय करायचं, हे देखील या लेखात समजावले आहे.
PM किसान सन्मान निधी योजनेसाठी महत्त्वपूर्ण सूचना: पाच आवश्यक कामे
१. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा
पहिले आणि महत्त्वाचे काम म्हणजे आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून ठेवणे. आपल्या बँक खात्याशी आधार लिंक आहे का, हे तपासणे आवश्यक आहे.
२. आधार सीडिंग स्थिती तपासा
दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे बँक खाते की स्थिती के साथ अपना आधार सीडिंग चेक करणे. आपल्या बँक खात्याला आधार सीडिंग केले आहे का, हे तपासून घ्या. जर ठीक असेल, तर तुम्हाला अधिक काही करण्याची गरज नाही.
३. DBT पर्याय सक्रिय ठेवा
तिसरे काम म्हणजे आपल्या बँक खात्यात DBT (Direct Benefit Transfer) पर्याय सक्रिय ठेवणे. सर्व शासकीय योजना DBT अंतर्गत पैसे ट्रान्सफर केल्या जातात. त्यामुळे DBT पर्याय सक्रिय असणे आवश्यक आहे.
४. EKYC पूर्ण करा
चौथे काम म्हणजे EKYC प्रक्रिया पूर्ण करणे. जर तुमची EKYC प्रक्रिया अद्याप पूर्ण नसेल, तर ती लवकरात लवकर पूर्ण करा.
५. आधार सीडिंग स्थितीची पडताळणी करा
पाचवे आणि शेवटचे काम म्हणजे PM किसान पोर्टलवरील “Know Your Status” मॉड्यूल अंतर्गत आधार सीडिंग स्थितीची तपासणी करणे. तुम्ही जेव्हा PM किसान योजनेचा स्टेटस पाहता, तेव्हा आधार सीडिंग स्थिती ‘Yes’ असणे गरजेचे आहे.
पाचही कामे पूर्ण असतील तरच मिळेल हप्ता
या पाचही कामांची पूर्तता झाल्यासच PM किसान योजनेचा 18 वा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होईल. अन्यथा, हप्ता मिळणार नाही. जर तुमचे सर्व कामे पूर्ण असतील, तर तुम्ही निश्चिंत राहा.
पीएम किसान सम्मान निधि योजना के तहत सभी पात्र किसानों को प्रति वर्ष ₹6,000 की आर्थिक सहायता प्रदान की जाती है। सभी किसान भाई-बहन योजना का लाभ उठाने के लिए दिए गए पहलुओं को अपनाएं।
अधिक जानकारी के लिए https://t.co/vEPxtzRca7 पर जाएं।#PMKisanSammanNidhi #PMKisan pic.twitter.com/IKrz6HwvNr— Pradhan Mantri Kisan Samman Nidhi (@pmkisanofficial) August 29, 2024
शेतकरी बांधवांनी ह्या सूचनांचे पालन करून आपला हप्ता वेळेत मिळवावा.