सोयाबीन कापूस अनुदान राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज, 3 सप्टेंबर 2024 रोजी, राज्य शासनाने राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.
सोयाबीन कापूस अनुदान निधी वितरणाच्या तयारीत कृषी विभाग
कालच, राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 10 सप्टेंबर 2024 पासून निधी वितरण करण्याचे निर्देश कृषी मंत्र्यांनी दिले होते. या संदर्भात, शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी लागणाऱ्या निधीच्या वितरणाला मंजुरी मिळाली आहे.
पुरवणी मागणीद्वारे केलेली तरतूद
राज्य शासनाने पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 4,114.94 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1,548.34 कोटी रुपये आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646.34 कोटी रुपयांचा निधी वाटपासाठी मंजूर करण्यात आला आहे.
सोयाबीन कापूस अनुदान पहिल्या हप्त्याचे वितरण
या निधीचा पहिला हप्ता म्हणून, 2,516.80 कोटी रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यास मंजुरी मिळाली आहे. हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर 10 सप्टेंबर 2024 पर्यंत जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीची योजना
राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.