मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य शासनाने अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024 निश्चित केली होती. परंतु, राज्यातील अनेक महिलांनी अद्यापही अर्ज केलेले नाहीत. त्यामुळे अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख कोणती आहे, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण योजनेबाबतची सखोल माहिती जाणून घेणार आहोत.
योजनेची घोषणा आणि अर्ज प्रक्रिया
गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून योजनेची चर्चा सुरू आहे. सुरुवातीला शासनाने अनेक कागदपत्रे आणि अटी ठेवलेल्या होत्या. परंतु, निवडणुकीचा विचार करून अधिकाधिक महिलांना योजनेत समाविष्ट करण्यासाठी वारंवार अटींमध्ये बदल करण्यात आले आणि कागदपत्रांची संख्या कमी करण्यात आली, ज्यामुळे अधिक महिला योजनेसाठी पात्र ठरल्या.
अर्ज प्रक्रियेत अडचणी आणि बदल
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज प्रक्रियेत महिलांची मोठी गर्दी दिसून आली होती. सीएसटी सेंटर, ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, आणि बँकांमध्ये महिलांनी अर्ज करण्यासाठी आणि आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी मोठी गर्दी केली. योजनेचे वेब पोर्टल सुरुवातीला उपलब्ध नव्हते, परंतु नंतर शासनाने ते विकसित केले. नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून अर्ज स्वीकारले जात होते.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख नाही
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. तटकरे यांच्या मते, ही अर्ज प्रक्रिया निरंतर राबवली जाणार आहे आणि 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख नसून अर्ज निरंतर स्वीकारले जातील.
महिलांसाठी महत्त्वाचे निर्देश
लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 3,000 रुपये आणि दुसऱ्या टप्प्यात 3,000 रुपये असा अनुदान वितरण सुरू आहे. 29, 30 आणि 31 ऑगस्ट रोजी पात्र महिलांच्या खात्यावर या टप्प्याचे वितरण केले जात आहे. महिलांनी आपल्या बँक खात्याशी आधार लिंक करणे आवश्यक आहे, जेणेकरून डीबीटीच्या माध्यमातून थेट अनुदान त्यांच्या खात्यावर जमा होईल.
अर्ज करण्यासाठी निरंतर प्रक्रिया
शासनाकडून योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया निरंतर सुरू राहणार असल्याने, महिलांनी काळजी करू नये. ज्या महिलांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांनी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
अधिक माहितीसाठी, अर्ज प्रक्रियेसाठी नजीकच्या सीएसटी सेंटर, ग्रामपंचायत, अंगणवाडी, किंवा अधिकृत वेब पोर्टलवर संपर्क साधा.