सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात चार महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या घोषणांमुळे अशा महिलांना दिलासा मिळणार आहे, ज्यांनी अर्ज भरला आहे, पण अजूनही त्यांच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही किंवा पैसे मिळालेले नाहीत. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात या घोषणांची माहिती दिली.
अर्ज मंजूरी आणि पैसे क्रेडिट
ज्या महिलांचे अर्ज 24 ऑगस्टपर्यंत प्राप्त झाले आणि मंजूर झाले, त्या सर्व महिलांच्या खात्यांमध्ये पैसे पाठवण्यात आले आहेत. ज्यांचे अर्ज 24 ऑगस्टनंतर प्राप्त झाले, त्यांची पडताळणी प्रक्रिया जिल्हास्तरीय स्तरावर सुरू आहे. मंजूर अर्जांची यादी विभागाकडे पाठवली जाते आणि त्यानंतर बँकांकडे पाठवून संबंधित महिलांच्या खात्यांमध्ये पैसे क्रेडिट केले जातात. सप्टेंबर महिन्यात ज्यांच्या खात्यांमध्ये अद्याप पैसे जमा झाले नाहीत, त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे 4,500 रुपये थेट खात्यात क्रेडिट केले जातील.
अर्ज reject झालेल्यांसाठी दुसरी संधी
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घोषणा केली आहे की, ज्या महिलांचे अर्ज reject झाले आहेत, त्यांना पुन्हा अर्ज भरण्याची संधी दिली जाणार आहे. जवळपास 50,000 अर्ज असे आहेत, जे reject झालेले आहेत. प्रत्येक अर्जामागे reject होण्याचे काही कारण आहे. आता या अर्जदारांना त्यांची पात्रता सिद्ध करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात पुन्हा अर्ज भरण्याची संधी दिली जाईल. अधिक माहिती लवकरच आपल्या वेबसाईटवर उपलब्ध होईल.
बँकेने पैसे कट केल्यास दिलासा
ज्या महिलांच्या खात्यात पैसे पोहोचले आहेत पण बँकेने पैसे कट करून घेतले आहेत, त्यांना देखील दिलासा मिळणार आहे. महिला व बालविकास विभागाने अशा महिलांच्या तक्रारींची दखल घेतली आहे आणि त्यांना योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महत्त्वपूर्ण घोषणा: अर्जदारांना दिलासा मिळणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सप्टेंबर महिन्यात चार महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे अनेक महिलांना दिलासा मिळणार आहे. या घोषणांची माहिती नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
1. अर्जाचे कारण जाणून घेण्याची सोय
ज्या महिलांचे अर्ज reject झाले आहेत, त्यांना आता अर्जाच्या कारणाचे तपशील मिळवण्याची संधी मिळणार आहे. अर्ज का reject झाला, कोणती माहिती अपुरी आहे किंवा कोणते कागदपत्र चुकीचे लावण्यात आले आहे, हे ‘view reason’ बटणावर क्लिक करून समजता येईल. महिलांनी आपल्या अर्जाच्या कारणांचे तपशील जाणून घेऊन योग्य कागदपत्रे तयार ठेवावीत, जेणेकरून पुढील संधी मिळाल्यावर अर्ज अचूकपणे भरता येईल.
2. बँक खात्यातील रक्कम कपात न करण्याचे निर्देश
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मिळालेली रक्कम पिक विमा, पिक कर्ज किंवा कोणत्याही शासकीय योजनेचे अनुदान कपात न करता पूर्णपणे लाभार्थ्यांना देण्याचे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी बँक प्रतिनिधींना दिले आहेत. महिलांच्या बँक खात्यात जमा झालेली रक्कम कोणत्याही शुल्काच्या बाबतीत कपात न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बँकांना कोणत्याही प्रकारची कपात करण्यास मनाई करण्यात आली आहे, ज्यामुळे महिलांना योजनेचा संपूर्ण लाभ मिळेल.
3. अर्ज पुनर्भरणाची संधी
ज्या महिलांचे अर्ज reject झाले आहेत, त्यांना पुन्हा अर्ज भरण्याची संधी देण्यात येणार आहे. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, जवळपास 50,000 अर्ज असे आहेत, जे reject झालेले आहेत. या महिलांना सप्टेंबर महिन्यात पुनर्भरणाची संधी दिली जाईल. यासाठी अर्जदारांना त्यांच्या अपूर्ण माहिती आणि कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज पुन्हा भरावा लागणार आहे.
4. आधार-बँक लिंकिंगची आवश्यकता
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे की, महिलांचे स्वतःचे आधार कार्ड त्यांच्या स्वतःच्या बँक खात्यासोबत लिंक असणे आवश्यक आहे. जर आधार कार्ड आणि बँक खाता लिंक नसेल, तर महिलांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी, कारण योजनेचे पैसे थेट खात्यात जमा करण्यासाठी आधार-बँक लिंकिंग आवश्यक आहे.