उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीत घट, सोलापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम

गुरुवार, ५ सप्टेंबर सकाळी ६:३० वाजता हाती आलेल्या ताज्या अपडेटनुसार, उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीत थोडीशी घट झाल्याचे आढळून आले आहे. सोलापूर जिल्हा आणि आसपासच्या परिसरात आज पर्यंत ४३९.८ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली असून उजनी धरण परिसरात ३९६ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे.

पाण्याच्या आवकेत १,३०० क्युसेकची घट

काल दिवसभरात सोलापूर जिल्हा आणि उजनी धरण परिसरात अत्यल्प पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकेत १,३०० क्युसेकची घट झाली आहे. काल ९,९०० क्युसेक पेक्षा जास्त असलेली आवक आज सकाळी ६:३० वाजता ८,६३१ क्युसेक एवढी झालेली आहे.

उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा

आत्ताच आलेल्या अपडेटनुसार, उजनी धरणामध्ये एकूण ११९.६२ TMC एवढा पाणीसाठा असून त्यापैकी ५५.९६ TMC पाणी हे उपयुक्त पाणीसाठा आहे. उजनी धरणाची पाण्याची पातळी ही १०४.४६% एवढी झालेली आहे. उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात कोणताही बदल करण्यात आलेला नसून, उजनी धरणामधून सिनामाडा डाव्या कालव्यामध्ये २१० क्युसेक च्या विसर्गाने पाणी सोडण्यात येतंय. तर दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही ८० क्युसेक चा विसर्ग होतोय.

ऊर्जानिर्मिती आणि भीमा नदीत विसर्ग

उजनी धरणामधील १६०० क्युसेक च्या विसर्गाचा उपयोग हा ऊर्जा निर्मितीसाठी होत असून, काल सकाळीच सांगितल्याप्रमाणे उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये असलेला ५,३०० क्युसेक चा विसर्ग हा आज सकाळीही कायम आहे. त्यामुळे उजनी धरणामधून एकूण ६,९०० क्युसेक चा विसर्ग हा भीमा नदीच्या पात्रात होतोय.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top